Saturday, March 7, 2026

मर्द आम्हीच हिंदू खरे, दुश्मनाना भरे कापरे

 

मर्द आम्हीच हिंदू खरे, दुश्मनाना भरे कापरे
देश रक्षाव्या, धर्म तारव्या
कोण झुंझात मागे उरे || धृ ||

भारता आम्ही तुलाच देव मानतो
हाच हिंदू धर्म एक जाणतो
सांगतो महान आमुची परंपरा
रक्त शिंपूनी पवित्र ठेवितो धरा
याच भूमीवरी, प्राण गेला तरी
आमुची वीरगाथा उरे || 1 ||

व्हा पुढे आम्हा धनाजी बाजी सांगती
मर्द हो उठा कडाडतात नौबती
राजपूत कधी ना संगरातूनी हटे
मारुनी दहास एक मराठे कटे
सिंधु ओलांडूनी धावती संगिनी
पाय आता न मागे सरे || 2 ||

वादळापरी आम्ही पुढेच चालतो
जय शिवाजी गर्जुनी रणात झुंझतो
घोष दुमदुमे हा पुन्हा दिगंतरी
पूर्वाजा परी अजिंक्य दिव्य संगीरी
घेऊ शत्रूवरी झेप वाघापरी
मृत्यू आम्हा पुढे घाबरे ||
3 ||

No comments:

Post a Comment